Posted on Wednesday, January 3, 2018
येथील आयुश फाऊंडेशनच्यावतीने स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्त्री मुक्ती दिन ही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित शिक्षण विभागात साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेल्या सौ. रेखा पुंड यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले.
Posted on Friday, July 7, 2017
आयुश फाउंडेशन परभणी या नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. ७ जुलै २०१७ रोजी रक्तदान
शिबीर घेण्यात आले.
या रक्तदान शिबीराचे आयोजन शहरातील सुप्रसिद्ध
बालरोगतज्ञ डॉ. संदीप कार्ले यांचे सर्वज्ञ हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. येथील
थैलेसीमिया डे केयर सेंटरच्या थैलेसीमिया पिडीत बालकांना रक्त पुरवठा करण्यासाठी हे शिबीर
घेण्यात आले. या शिबिरात आयुश फाउंडेशनच्या ऐकूण ११ रक्तदात्याने स्व-इच्छेने रक्तदान केले. या प्रसंगी डॉ. संदीप
कार्ले यांनी उपस्थितांना थैलेसीमिया या आजाराची माहिती देवून मार्गदर्शन केले. या
शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्त संकलन पेढीतील डॉ. कनकदंडे, जनसंपर्क
अधिकारी श्री सुहास देशमुख व त्यांच्या चमूने शास्त्रोक्त पद्धतीने रक्त संकलन
केले. आयुश फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सौ. रेखा पुंड आणि संस्थापक
सचिव श्री वामनकुमार वाणी यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच फाउंडेशनचे सदस्य श्री सतीश अनवते, श्री
नकुल पवार, श्री महेंद्र हुलेकर यासह फाउंडेशनचे
स्वयंसेवक श्री दिपक ढवळे, श्री अतुल रणखांब वा प्रा. माधव पाटील यांनी शिबिराच्या
यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
Posted on Wednesday, July 5, 2017
To contribute to the Maharashtra State Government's tree plantation, Ayush Foundation organized tree plantation drive in the Lokash Nagar area of the Parbhani city. In this drive around 50 trees had been planted at specific distance. For this plantation esteemed citizens of the area were voluntarily present and contributed their share by helping in the plantation drive of the Foundation. Three different types of trees had been planted these trees were provided by the Forest Department of the Maharashtra State Government at concessional rates. For this plantation Adv. Rasave, Mr. Bhagwan Harkal, Mr. Panchal, Mr. Hiware etc. citizens were present. Ayush Foundation volunteers Mr. Satish Anwate, Mr. Nakul Pawar, Mr. Deepak Dhawale, Mr. Atul Rankhamb worked for the success of the tree plantation drive.