आयुश फाऊंडेशनच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी
येथील आयुश फाऊंडेशनच्यावतीने स्त्री शिक्षणाच्या जनक
सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांसाठी
केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्त्री मुक्ती दिन ही
साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित शिक्षण विभागात साधन व्यक्ती
म्हणून कार्यरत असलेल्या सौ. रेखा पुंड यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवन कार्याचा
आढावा घेऊन त्यांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आयुश फाऊंडेशनचे संस्थापक सचिव श्री वामनकुमार वाणी यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अधाक्षीय
समारोपात आयुश फाऊंडेशनद्वारे शिक्षण, आरोग्य, महिला
सक्षमीकरण, पर्यावरण, आदि क्षेत्रात कार्य केले जाते असे सांगितले. या कार्याचाच
एक भाग म्हणून आद्य शिक्षिका सावित्रीबाई
फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अक्षय शिंदे यांनी तर
आभार प्रदर्शन श्री महेंद्र हुलेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे सदस्य श्री सतीश अनवते, श्री
नकुल पवार, यासह फाउंडेशनचे स्वयंसेवक रंगनाथ गायकवाड यांनी केले.
0comments
Post a Comment